1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (10:21 IST)

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि चविष्ट ओव्याचे लाडू खा

Eat nutritious and tasty ova laddu to boost immunity in winter nutritious and tasty ova laddu to boost immunity in winter recipe Tasty and Delicious ova laddu recipe in marathi पौष्टीक आणि चविष्ट ओव्याचे लाडू हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टीक आणि चविष्ट ओव्याचे लाडू खा  रेसिपी in marathi webdunia मराठी
हिवाळ्यात ओव्याचे लाडू खूप फायदेशीर असतात. हे लाडू रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, पण प्रसूतीनंतरही आईने हे लाडू खावेत.ओव्या मध्ये लोह, सोडियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यात मुबलक प्रमाणात फायबर देखील असते, जे योग्य पचन राखण्यास मदत करते. ओवा लाडू बनवायला खूप सोपे आहेत. हे लाडू आपण महिनाभर साठवून ठेवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
ओवा लाडू बनवण्याचे साहित्य - 
1 किलो ओवा पूड , दीड किलो गव्हाचे पीठ, 250 ग्रॅम डिंक, 1 सुके  किसलेले खोबरे,  साखर किंवा गूळ आणि आवश्यकतेनुसार साजूक तूप.
 
कृती -
गॅसवर कढई तापत ठेवा.
आता कढईत 1 चमचा साजूक तूप टाका आणि मंद आचेवर तूप गरम होऊ द्या.
यानंतर तुपात डिंक टाका आणि चांगले परतून रिकाम्या भांड्यात काढून घ्या.
आता डिंक बारीक करून घ्या.
कढई गरम करून त्यात तूप घाला.
आता त्यात गव्हाचे पीठ घालून मंद आचेवर परतून घ्या जोपर्यंत त्यातून सुवास येत नाही. 
नंतर त्यात डिंक आणि किसलेले खोबरे घाला.
त्यात ओवा पीठ घालून गव्हाचं पीठ मिसळा.
ते थंड झाल्यावर त्यात साखर किंवा गूळ घाला,
साखर घातल्याने ओवाच्या तिखटपणा कमी होतो.
आता या मिश्रणापासून लाडू बनवा. चविष्ट आणि पौष्टीक ओवा लाडू खाण्यासाठी तयार.