रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:40 IST)

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी

दिवाळीत घरच्या घरी चविष्ट  गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा मिष्टान्न कमी वेळेत तयार होतो. चला, जाणून घ्या काजू रोज बर्फी कशी बनवायची.
 
काजू गुलाब बर्फीचे साहित्य:
500 ग्रॅम व्हाईट चॉकलेट, 200 ग्रॅम भाजलेले काजू, 2 ग्रॅम सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, 1-2 कांड्या केशर, 4-6 वेलची, 5 थेंब गुलाब सरबत, 1/2 कप साखर किंवा गूळ
 
काजू गुलाब बर्फी बनवायची कृती -
चॉकलेट वितळवून घ्या.अर्धे काजू घाला. उर्वरित साहित्य घाला. चांगले मिसळा आणि साच्यात घाला. आता उरलेले भाजलेले काजू आणि गुलाबाच्या पाकळ्या वरती पसरवून द्या. 10-15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. काजू गुलाब बर्फी तयार आहे. आपल्या आवडेल तसे आकार द्या. आणि सर्व्ह करा. 
 
कुकिंग टिप्स - 
* जर आपल्याकडे गुलाब नसेल तर तुम्ही गुलाबाची चव असलेला स्वीटनर देखील घालू शकता.
 जर आपल्याला मिठाईमध्ये गुलाबाची चव नको असेल तर आपण गुलाबाची पाकळी देखील वगळू शकता.
* या बर्फीमध्ये आपण काही बदाम आणि पिस्तेही घालू शकता.
* आपण  साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता, पण यामुळे बर्फी पांढऱ्याऐवजी तपकिरी रंगाची होईल.
* आपल्याला आवडेल तसा आकार द्या . बर्फी मऊ राहण्यासाठी आपण  इच्छित असल्यास छेना दुधाने मळू शकता.
* आपल्या कडे साचा नसल्यास, आपण साच्याशिवाय एका ताटलीत देखील बर्फी सेट करू शकता.