1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated: रविवार, 13 डिसेंबर 2020 (10:48 IST)

Somvati Amavasya कार्तिक सोमवती अमावास्या महत्त्व, मुहूर्त व पूजा विधी

सन 2020 मधील कार्तिक अमावास्या या वर्षातील अखेरची अमावास्या ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदाची कार्तिक अमावास्या दर्श सोमवती अमावास्या म्हणून साजरी केली जाईल. 
 
दर्श सोमवती ‍अमावास्या तिथी मुहूर्त
अमावास्या तिथी सोमवारी येत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. यंदा कार्तिक अमावास्या 14 डिसेंबर 2020 रोजी आहे. वर्ष 2020 मधील दर्श सोमवती अमावास्या रविवार, 13 डिसेंबर 2020 रोजी उत्तररात्रौ 12 वाजून 44 मिनिटांनी प्रारंभ होऊन सोमवार, 14 डिसेंबर 2020 रोजी रात्री 09 वाजून 46 मिनिटांनी संपेल. 
 
दुपारी 11 वाजून 32 मिनटापासून ते 12 वाजून 14 मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त आहे आणि दुपारी 3 वाजून 27 मिनिटापासून ते 4 वाजून 54 मिनिटापर्यंत अमृत काळ मुहूर्त आहे. या दरम्यान पितृ पूजा आणि शिव पूजा शुभ फल प्रदान करणारे आहे.
 
धार्मिक ग्रंथांप्रमाणे सोमवती अमावास्या शुभ असल्याची सांगितले आहे. या अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, नामस्मरण, आराधना करणे लाभदायक असते.
 
सोमवती अमावास्याचे महत्त्व
वर्षभरात सुमारे दोन ते तीन वेळा सोमवती अमावास्या येते. या दिवशी सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसल्यास पवित्र नदीत किंवा तलावात स्नान, व्रत, उपासना याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सवाष्ण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि प्रार्थना करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच पूर्वजांचे स्मरण केले जाते. 
 
यंदा कार्तिक पौर्णिमा आणि अमावास्या दोन्ही सोमवारी येणे हा अद्भूत योग मानला जात आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातील सोमवती अमावस्या या वर्षातील तिसरी सोमवती अमावास्या असेल. यापूर्वी मार्च आणि जुलै महिन्यात सोमवती अमावास्या होती. याच दिवशी सन 2020 मधील अखेरचे सूर्यग्रहण लागेल.