सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:50 IST)

कोणत्या महिन्यात देवाला कोणते फुल व्हावे, सुंदर माहिती

पदमपुराणात कोणत्या महिन्यात कोणते फुल देवाला अर्पण करणे लाभकारी असत हे सांगितले आहे.
 
चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ -
चैत्र महिन्यात चंपा, चमेली, दौना, कटसरैया आणि वरुण वृक्षाच्या फुलांनी देखील श्री विष्णूंची पूजा केली जाऊ शकते. माणसाला एकाग्रतेने लाल किंवा कोणत्याही रंगाच्या कमळाच्या फुलांनी श्री हरीची पूजा करणे विशेष फलदायी असत.वैशाख महिन्यात केवड्याची पाने घेऊन महाप्रभु विष्णूंची पूजा करावी. ज्येष्ठ महिन्यात त्या ऋतूनुसार मिळणारी फुले किंवा विविध प्रकारची फुले देवाला अर्पण करावी. जे भाविक असं करतात प्रभू विष्णू त्यांच्या वर प्रसन्न आणि समाधानी होतात.
 
आषाढ, श्रावण आणि भाद्रपद - 
आषाढाच्या महिन्यात कण्हेर, लाल रंगाची फुले किंवा कमळाच्या फुलांनी देवाची पूजा केली पाहिजे. जे लोक या महिन्यात सोनेरी रंगाच्या कदंबाच्या फुलांनी सर्वव्यापी गोविंदाची पूजा करतात, त्यांना यमराजाची भीती नसते. तुळशी, श्यामा आणि अशोकाने पूजा केल्यावर श्री विष्णू सर्व त्रास नाहीसे करतात. जी लोक श्रावणात जवस किंवा दुर्वाने श्री जनार्दनाची पूजा करतात, त्यांना देवांकडून प्रलय काळापर्यंत इच्छित भोगाची प्राप्ती होते. भाद्रपद महिन्यात चंपा, पांढरी फुले आणि पिवळे आणि लाल रंगाच्या फुलांनी पूजा केल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष -
आश्विनाच्या शुभ महिन्यात जुई, चमेली, कमळ आणि विविध प्रकारचे शुभ फुलांनी श्री हरीची पूजा करावी. असं केल्यानं माणूस या पृथ्वी वर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्यांना प्राप्त करतो. कार्तिक महिन्यात श्री हरी विष्णूंची पूजा तीळ आणि त्या वेळी सर्व मिळणारे फुल अर्पण करावे. मार्गशीर्ष महिना जो विष्णूंचाच रूप आहे, या मध्ये विविध फुलांनी, नैवेद्याने, धुपाने आणि आरतीने पूजा केल्यानं सर्व सांसारिक त्रासातून आराम मिळतो.
   
पौष, माघ आणि फाल्गुन -
पौष महिन्यात सर्व प्रकारचे तुळशीने आणि फुलांनी पूजा करणे फायद्याचे मानले आहे. अशा प्रकारे माघ महिन्यात पिवळ्या रंगाची फुले जसे की मोहरी, झेंडू आणि इतर सर्व रंगांची फुले देवाच्या चरणी अर्पण करावी. फाल्गुनात देखील पिवळ्या रंगाची फुले आणि नवे फुले किंवा सर्व प्रकारच्या फुलांनी श्रीहरी विष्णूंची पूजा करावी. अशा प्रकारे श्री जगन्नाथाची पूजा केल्याने माणूस श्री विष्णूंच्या कृपेने अविनाशी वैकुंठाला प्राप्त होतो.