रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (17:31 IST)

केळीच्या पानावर जेवण का करावे ?

नैवेद्य दाखवायचा असो, सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी...
 
हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते. वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते.
 
भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे. केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत.
 
केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज, पुरळ, फोडं अशा समस्या दूर होतात.
 
केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात "एपिगालोकेटचीन गलेट" आणि इजीसीजीसारखे "पॉलिफिनोल्स अँटिअॉक्सीडेंट "आढळतात. याच पानांमार्फत अँटिअॉक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते.
 
मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते.
 
केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो.
 
केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.