गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (10:19 IST)

जेव्हा गणपतीने घेतली 7 बहिणींची परीक्षा

हिंदू कुटुंबात, मुलांना लहानपणापासूनच देवाची पूजा करायची आणि त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान शिकविले जाते. आज आम्ही आपल्यासाठी सात बहिणींची गोष्ट सांगत आहोत.
 
एके काळी सात बहिणी होत्या. त्यापैकी 6 बहिणी तर देवाची पूजा करायचा, पण सातवी बहिणी पूजाच करत नव्हती. एकदा गणेशाने विचार केला की आपण या 7 बहिणींची परीक्षा घ्यावी. असा विचार करून ते साधूच्या वेशात येऊन दार ठोठावतात.
 
पहिल्या बहिणीला म्हणाले की मी फार दुरून आलो आहो. मला खीर खायची आहे तू माझ्यासाठी बनवून दे. तिने नकार दिला अश्या प्रकारे गणेशांना सर्व सहा ही बहिणींनी नकार दिला. पण सातव्या बहिणीने होकार देऊन तांदूळ निवडणे सुरू केले आणि त्यांच्या साठी खीर बनवायला सुरू केली. 
 
खीर शिजताना थोडी खीर तिने चाखून बघितली जी अर्धवट शिजलेली होती आणि मग खीर शिजल्यावर तिने ती साधूला दिली. त्या साधूने तिला देखील खीर खाण्यास सांगितले तर ती म्हणाली की मी तर खीर बनवतानाच चाखून बघितली. 
 
गणेश आपल्या रूपात प्रकट झाले आणि त्या सातव्या बहिणीला म्हणाले की मी तुला स्वर्गात नेईन, त्या मुलीने उत्तर दिले की मी एकटी तर अजिबात जाणार नाही. माझ्या सह माझ्या सहा बहिणींना देखील घेऊन चला. गणेश आनंदी झाले आणि ते सगळ्या बहिणींना आपल्या सह स्वर्गात घेऊन गेले आणि त्यांना स्वर्गात भटकंती करून परत  भूलोकी आणले. अशा प्रकारे ही गोष्ट संपली.