अकबर बिरबल यांची मजेशीर गोष्ट : हिरवा घोडा

Last Modified सोमवार, 7 डिसेंबर 2020 (13:07 IST)
एकदा बादशहा अकबरने बिरबलाची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी बिरबलाला बोलाविले आणि म्हणाले 'बिरबल मला माझ्या घोड्याचा कंटाळा आलेला आहे. मला तेच ते रंग बघून वीट आला आहे. मला घोड्याचा रंग बदलून पाहिजे. बिरबलने विचारले की महाराज आपल्याला कोणत्या रंगाचा घोडा पाहिजे, मला सांगा मी आपणास मागवून देतो. त्यावर अकबर म्हणाले की मला काळा, पांढरा, पांढऱ्यावर काळे पट्टे किंवा काळ्यावर पांढरे पट्टे असलेला किंवा तपकिरी किंवा त्या तपकिरी
रंगात पांढरे पट्टे असलेला नेहमीच्या रंगांच्या व्यतिरिक्त रंग असलेला घोडा पाहिजे. तुला असं करणं जमत नसेल तर या पुढे मला आपले तोंड देखील दाखवू नको.

बादशहाचे बोलणे ऐकून बिरबल म्हणाले 'की महाराज हे काम झालेच असं समजावं' मी आपल्या समोर लवकरच घोडा घेऊन येईन. असे म्हणून बिरबल निघून गेले. त्यांना बादशहा आपली परीक्षा घेत आहे हे लक्षात आलेलं असत.

असेच तीन चार दिवस भटकंती करून बिरबल पुन्हा बादशहा समोर जातात. त्यांना बघून बादशहा विचारतात कुठे आहे माझा घोडा ? बिरबल म्हणे बादशहा हुजूर मी घोडा मिळवला आहे आणि तो हिरव्या रंगाचा आहे. मग तू आपल्या बरोबर का घेऊन आला नाहीस बादशहा विचारतात.
बिरबलने उत्तर दिले की हुजूर मी तो घोडा आणणारच होतो पण .. पण काय बादशहाने विचारले त्या घोड्याच्या मालकाच्या दोन अटी आहेत पहिली की ह्या घोड्याला नेण्यासाठी बादशहाने स्वतःच यावे आणि दुसरी .... दुसरी कोणती? बिरबल म्हणाले की मालकाने सांगितले की बादशहाला इतर कोणत्याही रंगाच्या व्यतिरिक्त माझा हिरव्या रंगाचा घोडा पाहिजे, तर त्यांनी देखील रविवारपासून ते शनिवारपर्यंत हे वार सोडून इतर वारी यावं आणि आपल्या घोड्याला घेऊन जावं. बिरबलाचे हे उत्तर बघून आता मात्र बादशहाचा चेहऱ्याच्या रंगच उडाला होता. त्यांना बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले आणि त्यांनी बिरबलाची खूप प्रशंसा केली.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात
साधारणपणे असे म्हणतात की लग्नानंतर मुलींचा चेहर्‍यावर एक वेगळाच ग्लो असतो. कारण त्या ...

Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या

Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य बाब आहे. तरी टॅनिंगच्या समस्येमुळे त्वचा निस्तेज आणि ...

12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय ...

12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,  भारतीय नौदलात 2500 पदांवर होणार भरती
विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ...

या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो

या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो
कोरोना विषाणूची दुसरी लाट एक धोकादायक रूप घेत आहे. दररोज देशभरातून प्रकरणे समोर येत आहेत. ...

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका
देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत ...