गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (15:08 IST)

Aastad Kale mother Passed Away: मराठी चित्रपट अभिनेता आस्ताद काळेच्या आईचे निधन

astad kale
Aastad Kale mother Passed Away: मराठी मालिका, मराठी नाटक मराठी चित्रपट अभिनेता आस्ताद काळे यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाने आस्ताद खूपच भावुक आणि दुखी झाला. आस्ताद ने सोशलमिडीयावर चाहत्यांना ही वाईट बातमी दिली. 
त्याने फेसबुकवर पोस्ट करत लिहिले " ती गेली ...तेव्हा.. "

पुढील दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, घनव्याकूळ मी अजून रडलो नाही. आस्तादची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
आस्तादच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आस्तादच्या वडिलांनी पत्नीच्या निधनाची माहिती दिली होती. आस्तादचे वडील प्रमोद काळे यांनीही पोस्ट शेयर करत पत्नीच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी पत्नी सुनिता काळे यांचे काही फोटो शेयर केले होते . या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, "गूड बाय डियर... पुन्हा कधीतरी नक्की भेटू…तेव्हा राहिलेलं सगळं बोलू…"
अनेक कलाकार आणि चाह्त्ये आस्तादच्या आईला श्रद्धांजली वाहत आहे. तसेच त्याला धीर देत आहे. 
 
Edited by - Priya Dixit