मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

‘नशीबवान’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित

राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. ‘नशीबवान’ असे या चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘नशीबवान’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील आहेत. प्रशांत विजय मयेकर यांनी सह निर्मती केली आहे. ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’च्या (पिफ) स्पर्धा विभागातही या चित्रपटाची निवड झाली आहे. ‘नशीबवान’च्या दिग्दर्शनासह कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी अशी जबाबदारी अमोल वसंत गोळे यांनी सांभाळली आहे.