ganesh chaturthi
✕

"गर्भ" हे नाटक म्हणजे आपल्या अस्तित्वाला निर्माण करण्याचा प्रवास

Updated: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (17:21 IST)
मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक गर्भ मध्ये कलेचा आणि कलाकारांचा उन्मुक्त प्रवास पहायला मिळतो . सांस्कृतिक क्रांतीची प्रेक्षकांच्या मनात ठिणगी लावणार हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांना सकारात्मक विचार देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. कलाकारांना एक वैचारिक कलाकार म्हणून निर्माण करण्याची चेतना हे नाटक कलाकारांणमध्ये निर्माण करत आहे.
या नाटकामध्ये कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर , कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के आपल्या कलेतून हे नाटक रंगमंचावर सादर करत आहेत.
१२ ऑगस्ट १९९२ पासून “ थियेटर ऑफ रेलेवंस”रंग सिद्धांत जनतेसाठी ‘जन चिंतन मंच ‘ म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स” नाट्य दर्शनाने , रस्ते, चौक, गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे.
‘थिएटर ऑफ रेलेवंस’चे सिद्धांत
१)‘थिएटर ऑफ रेलेवंस’हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
२) कला ही कलेसाठी नसून समाजाप्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम  म्हणून उपलब्ध असेल.
४) जे स्वतःचा बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.
( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे)
आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,  मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी”या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी,मुंबईत १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय ‘नाट्य उत्सव’ साजरा करण्याचे आयोजन केले आहे. आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे. कारण “थियेटर ऑफ रेलेवंस”रंग सिद्धांतानुसार,’प्रेक्षक’हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) मुंबई येथे अनुक्रमे १५ , १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता होईल.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

रोचक कोहली आणि आयुष्मान खुराना यांनी 'पहला प्यार दूसरी बार' मधील 'पुराने दिन' या गाण्याने त्यांच्या शाळेच्या आठवणी ताज्या केल्या

आयुष्मान खुरानाच्या 'उडता तीर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली

“विदर्भाची कुलस्वामिनी” कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर एक जागृत शक्तीपीठ

पुढील लेख
Show comments