शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:34 IST)

लवकरच काहे दिया परदेस ही मालिका संपणार

marathi serial kahe diya pardes
ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेली काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच संपणार आहे. 
 

या मालिकेत सध्या गौरी गरोदर असल्याचे पाहायला मिळत आहे. गौरी ही महाराष्ट्रीयन तर शिव हा उत्तरेकडचा असल्याने त्यांच्या दोघांच्या संस्कृतीत खूपच फरक आहे. त्यामुळे शिवच्या आईने गौरीचा सून म्हणून कधीच स्वीकार केलेला नाही. प्रत्येक गोष्टीत ती तिला टोमणे मारत असते. पण आता मालिकेच्या शेवटी शिवची आई गौरीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. तसेच गौरी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यामुळे शुक्ल परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या गोड वळणावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

या मालिकेची जागा आता संभाजी ही मालिका घेणार आहे. संभाजी राजांच्या आय़ुष्यावर ही मालिका आहे.