गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (12:37 IST)

मंदार चोळकर - प्रफुल्ल कार्लेकर यांच्या जोडगोळीचं "हे गजेश्वर गणपती" गाणं

नुकताच प्रदर्शित झालेल्या हृदयांतर या सिनेमाची गाणी  मंदार चोळकरने लिहिली तर प्रफुल्ल कार्लेकर यांनी संगीतबद्ध केली. या सिनेमातून आपण त्यांच्या जोडगोळीची कमाल पहिली आहे. प्रफुल्ल- मंदारची ही जोडगोळी आपल्यासाठी एक नवीन गाणं घेऊन आले आहे. सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. गणपतीच्या स्वागताची तयारी अगदी जोरदार करण्यात आली आहे. गणपतीच्या स्वागतासाठी 'अॅकापेला' फर्ममध्ये असलेलं "हे गजेश्वर गणपती"  गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  हे गाणं मंदारने लिहिलं असून प्रफुल्ल यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'अॅकापेला' हा संगीतचा एक प्रकार असून यामध्ये वाद्यांच्याऐवजी नैसर्गिक आवाजाचा वापर केला जातो. 
 
महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे, त्याचबरोबर स्वप्नील गोडबोले, कौशिक देशपांडे, आरोही म्हात्रे, प्रगती जोशी, उमेश जोशी, स्वरा मराठे, रोंकिणी गुप्ता, अदिती प्रभुदेसाई या गायकांचा देखील सहभाग आहे. सुनील केदार यांनी या गाण्याचं छायाचित्रण केलं आहे. मंदार आणि प्रफुल्लच्या इतर गाण्यांप्रमाणेच 'हे गजेश्वर गणपती' गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंका नाही.