Festival Posters

आज नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ”प्रस्तुती

Updated: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (13:17 IST)
 
१९९० नंतरच्या अर्थहीन होण्याच्या काळात, एकाधिकारशाही आणि वर्चस्ववादी धोरणांच्या काळात, विज्ञान हे तंत्रज्ञाना पुरते सीमित होण्याच्या काळात, केवळ खरेदी- विक्री यांवर भर असण्याच्या या काळात जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी "चिंतन”करण्यासाठी एका विचार मंचाची आवश्यकता आहे, या जाणिवेने १२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”हा रंग सिद्धांत जनतेसाठी 'चिंतन मंच' म्हणून उदयास आला.
 
“थिएटर ऑफ रेलेवंस”चे सिद्धांत :
 
1. असा रंगकर्म ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
 
2. कला, कलेसाठी नसून समाजाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करणारी असावी आणि हि कला लोकांच्या जीवनाचाच एक हिस्सा असावी.
 
3. कला जी मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ति माध्यमाच्या रुपात व्यक्त करेल.
 
4. जी स्वतःतील बदलांच्या माध्यमांचा शोध घेईल, स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे घेऊन जाईल.
 
5. असा रंगकर्म जो मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे स्रोत वा पद्धती बनेल.
 
( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.) 
 
आज विकासाच्या नावाखाली एकच चढाओढ सुरु झालेली आहे. या चढा ओढीत एकाधिकाराचा सर्वीकडे गोंधळ सुरु झालेला आहे. गर्दीचा आवाज आणि कोलाहल यामध्ये आपला आवाज ,आपल्या अंतकरणातील आवाज हा दबला जात आहे. किंबहुना त्याला दाबण्याचा षड्यंत्र सुरु झालेला आहे. यातच, आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात, माणसाने “माणूस”म्हणून राहणे हे एक आव्हान झाले आहे. मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गर्भ”, “अनहद नाद –Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी”या क्लासिक नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील आवाज ऐकवण्यासाठी, ही तीन कलात्मक नाटके घेऊन येत आहोत.
 
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ”आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा , १९ डिसेंबर २०१७ ला सायं. ५.०० वा. आणि 20 डिसेंबर २०१७ रोजी  रात्रौ ८.३० वाजता होईल.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments