सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:14 IST)

नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चित्रीकरणाचा मुहूर्त

नाशिकमध्ये एका मालिकेच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी साक्षात दिग्दर्शकांच्या भूमिकेत ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’ असे म्हणताच पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मुहूर्ताचा ‘क्लॅप’ वाजवत या मालिकेचा चित्रीकरणाचा शुभारंभ झाला.भारतीय सिनेमाचे जनक के दादासाहेब फाळके यांना खऱ्या अर्थाने आदरांजली मिळावी.त्यासाठी फाळके स्मारका बरोबर नाशिकमध्ये सिनेमा, वेब सीरीज, सीरियल यांचे मोठ्याप्रमाणावर चित्रीकरण व्हावे, जेणेकरून नाशिकचा विकास व्हावा, नाशिक मध्ये रोजगार निर्माण व्हावा, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना नाशिकमध्येच वाव मिळावा व त्या अनुषंगाने पर्यटन, हॉटेल आदी व्यवसाय वाढवा, नाशिकचे सांस्कृतिक, आणि कला क्षेत्रातील योगदान जास्तीत जास्त लोकापर्यत पोहचावे, या अर्थाने नमामि गोदाच्या फौंडेशन च्या चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव व राजेश पंडित यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी चर्चा केली होती.त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे आणि पोलीस आयुक्त पांडेय यांनी स्वतः सिरीयलच्या चित्रीकरणास उपस्थित राहून चित्रीकरणाचा मुहूर्त केला.
 
नमामि गोदा फौंडेशन ने मुंबई येथे जावून अनेक मोठमोठ्या निर्मात्यांशी, दिग्दर्शकांशी चर्चा करून त्यांना नाशिक मध्ये चित्रीकरणासाठी यावे म्हणून निमंत्रित करुन नाशिकचे व्यावसायिक महत्व पटवून दिले. मा पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे साहेबाचे मौल्यवान सहकार्य लाभलेले आहे. “भारतीय सिनेमाचे जनक कै. दादासाहेब फाळके यांना खऱ्या अर्थाने आदरांजली मिळावी म्हणून व नाशिकचा विकास व्हावा म्हणून जास्तीत जास्त निर्मात्यांनी नाशिक मध्ये येवून चित्रीकरण करावे त्यांना प्रशासकीय पातळीवर सर्वोतपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” असे जिल्हाधिकारी  सुरज मांढरे आश्वस्त केले. तर संजय झनकर, फिल्म्स चे निर्माते/दिग्दर्शक यांनी येथून पुढे जास्तीजास्त सिनेमे / सिरिअल्स नाशिक मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार असे जाहीर केले.
 
रोल, कॅमेरा अक्शन व कट म्हणून मा कलेक्टर साहेबांनी दिग्दर्शकाच्या रुपात तर मा पोलीस आयुक्त साहेबांनी मुहूर्ताचा क्लॅप देवून खऱ्या अर्थाने सुरुवात केली.झी नाराठी वर ३० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे” या मालिकेचे चे चित्रीकरण आज सुरु झाले.याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते हार्दिक जोशी उर्फ आपला राणा दा अभिनेत्री अमृता पवार,नाशिकचे २२ कलाकार, इतर तांत्रिक कलाकार व दिग्दर्शक सचिन शिंदे, राहुल रायकर,आदिनाथ ढाकणे, प्रकाश वाघ , रवी जन्नवार व अनेक मान्यवर उपस्थित होते.