सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:33 IST)

मृण्मयीच्या ‘मन फकीरा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये अंकित मोहन, सायली संजीव, सुव्रत जोशी, अंजली पाटील हे चार कलाकार आहेत.  
 
पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.