सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (18:49 IST)

नवी मालिका : ठिपक्यांची रांगोळी वर

एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही गोष्ट कानिटकर कुटुंबाची आहे. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ आहे. 
 
असा हा हसता खेळता परिवार 4 ऑक्टोबरपासून रात्री 10 वाजता (Thipkyanchi Rangoli On Star Pravah )स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत जोडला जाणार आहे.
 या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपूर्वा आणि शशांक असं दोघांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे.
 
ठिपक्यांची रांगोळी या नाविन्यपूर्ण शीर्षकाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दारासमोर ठिपक्यांची रांगोळी काढत बसलेल्या माझ्या मुलीला पाहून मनात विचार आला की कसा एक ठिपका दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेष काढून जोडला जातो. बघताना हे सगळे ठिपके स्वतंत्र वेगळे एकमेकांपासून काही अंतरावर असले तरी जोडले गेल्यावर सुरेख नक्षी बनते. या मालिकेचं नाव ठिपक्यांची रांगोळी ठेवण्यामागचं हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले. जोडून राहिलो तर छान सुरेख नक्षी मात्र एक रेष जरी हलली तरी चित्र विस्कटतं.