मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (09:37 IST)

पिंकीचा विजय असो’मालिकेतील अभिनेत्याचा अपघात, हाताला दुखापत झाली

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.अभिनेता मालिकेचे चित्रीकरण करुन परत येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
 
विजय आंदळकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी विजयच्या या पोस्टवर कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विजय हा मालिकेचे शूटिंग करुन घरी येत होत्या. त्यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. त्याच्या हाताला खरचटले आहे. तसेच त्याच्या शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मार लागला आहे. विजयची अपघाताची बातमी समजताच सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच डॉक्टरांनी विजय ला आराम करण्यास सांगितले आहे.
अभिनेता विजय आंदळकर हा पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराज या भूमिकेत दिसत आहे. त्याच रावडीपणा आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. यापूर्वी तो ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत दिसला होता. अभिनेता मालिकाची शूटिंग करून परत येताना त्याचा अपघात झाला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.