मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (20:57 IST)

आता हा मराठी अभिनेता बांधणार लग्नगाठ; अशी आहे त्याची लव्हस्टोरी

chetan vadnare
Instagram
मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागून एक लग्न सोहळे साजरे होत आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्री बोहल्यावर चढत असल्याचे चित्र आहे. नुकतेच अक्षया देवधर-हार्दिक जोशी, आशय कुलकर्णी – सानिया गोडबोले यांच्यानंतर नुकतंच ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या नंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा चेतन वडनेरे सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे.
 
अभिनेता चेतन वडनेरे आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे. आणि त्याने त्याचे हे नाते कधीच लपवून ठेवले नाही. अभिनेत्री ऋजुता धारप आणि चेतन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. नुकतीच चेतनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत चेतन आणि ऋजुता दोघेही समुद्रकिनारी आहेत. त्याने आणि ऋजुताने हातात भेळ पकडलेली दिसत आहे आणि त्यावर ‘अँड काउंटडाउन बिगिन्स’, असे लिहिले आहे. चेतनच्या या पोस्टमुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
चेतन मूळचा नाशिकचा असल्याने त्याने तिथेच शालेय तसेच पदवीचं शिक्षण घेतलं होतं. अभिनयाच्या ओढीने त्याची पावलं मुंबईकडे वळली. नाटक, एकांकिका गाजवत असताना त्याला स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. तर मुंबईत जन्मलेली ऋतुजा हिने मुंबईत आपले शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एकांकिका स्पर्धेत यश मिळवले होते. त्यामुळे पुढे थिएटर करत असताना ‘फुलपाखरू’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. चेतन वडनेरे ‘फुलपाखरू’ या मालिकेत झळकला होता. याच मालिकेत ऋजुता देखील सहकलाकाराच्या भूमिकेत होती. ‘फुलपाखरू’च्या सेटवर चेतन आणि ऋजुता यांची भेट झाली होती. त्यानंतरच त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली असल्याचे समजते.

Edited by : Ratnadeep Ranshoor