राजस्थानमध्ये गरिबांना मिळणार गॅस सिलिंडर 500 रुपयांना, अशोक गेहलोत यांनी केली मोठी घोषणा
अलवर. राजस्थानमधील काँग्रेस सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या जवळपास एक वर्ष आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येत्या 1 एप्रिलपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. भारत जोडो यात्रेअंतर्गत अलवर जिल्ह्यातील मालाखेडा येथे आयोजित सभेत गेहलोत यांनी सोमवारी ही घोषणा केली.