शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (10:41 IST)

Jaipur :पुतण्याने काकूचे 10 तुकडे करून जंगलात फेकले

murder
दिल्लीत श्रद्धा वलेकरची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेली निर्घृण हत्याही लोक विसरू शकत नाहीत. आता असेच एक प्रकरण राजस्थानमधील जयपूरमधून समोर आले आहे. येथे एका पुतण्याने आपल्या विधवा काकूची हत्या केली. त्यानंतर तिच्या  मृतदेहाचे मार्बल कटर मशीनने 10 तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी आरोपी अनुज शर्मा उर्फ ​​अचिंत्य गोविंददास याला अटक केली आहे. यासोबतच जंगलातून मृतदेहाचे काही भागही सापडले आहेत.  
 
पोलीस अद्याप महिलेच्या शरीराच्या इतर अवयवांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली हत्यारे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.  सदर घटना  जयपूरच्या विद्याधरनगर भागातील लालपुरिया अपार्टमेंट सेक्टर-2 मधील आहे. येथे 11 डिसेंबर रोजी अनुजने आपली काकू सरोज शर्मा (64) यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. जंगलात फेकून देण्यापूर्वी त्याने बाथरूममध्ये मार्बल कटर मशीनने मृतदेहाचे 10 तुकडे केले 
 
यानंतर त्यांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन खोटी कहाणी रचून हरवल्याची तक्रार नोंदवली, मात्र स्वयंपाकघरात रक्ताचे डाग धुत असताना त्यांना कोणीतरी पाहिले आणिहृदयद्रावक घटना उघडकीस आली. यानंतर महिलेची मुलगी पूजा हिने अनुज विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्वजण थक्क झाले. 
 
फुटेजमध्ये अनुज बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या बॅगेत महिलेचा चिरलेला मृतदेह होता. कडक चौकशीत आरोपीने मृतदेहाचे अवयव कुठे पुरले होते तेही सांगितले, जे पोलिसांनी जप्त केले आहे. 
 
 मयत 'सरोजच्या पतीच्या निधनानंतर तिचा पुतणा अनुज तिची काळजी घेत असे. अनुजचा सर्व खर्च ती उचलत असे. सरोजला दोन मुली आणि एक मुलगा असून तो परदेशात राहतो.बी.टेक.चे शिक्षण घेतलेल्या अनुजच्या आयुष्यात काकूच्या  ढवळाढवळ करण्याचा राग आला. 11 डिसेंबरला त्याला दिल्लीला जायचे होते, पण त्याच्या काकूने नकार दिला. याचा राग मनात धरून त्याने हत्या केली. 

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनुज सिकर रोडवर असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात पोहोचला. येथून त्याने मार्बल कटर मशीन आणले. त्यानंतर मृतदेहाचे 10 तुकडे केले. ते सुटकेस आणि बादल्यांमध्ये भरून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी अनुजला अटक केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit