गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (13:32 IST)

अवतार 2 चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू

जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (अवतार 2) हा चित्रपट कालच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अवतारच्या पहिल्या भागा प्रमाणेच त्याचा दुसरा भागही चाहत्यांनी पसंत केला आहे, पण त्याच दरम्यान एक अतिशय आश्चर्यकारक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. 
 
हा चित्रपट पाहताना आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम शहरात जेम्स कॅमेरॉनचा अवतार: द वे ऑफ वॉटर हा चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
 
नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार,लक्ष्मीरेड्डी श्रीनू त्यांच्या भावा राजूसोबत अवतार 2 चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले असता. श्रीनू अचानक खाली कोसळले  आणि बेशुद्ध झाले . त्यांच्या  लहान भावाने त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
 
डॉक्टरांच्या अहवालानुसार, त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची पूर्व-अस्तित्वात असलेली समस्या होती आणि चित्रपट पाहत असताना अति उत्साहीपणामुळे त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. 
 
Edited By- Priya Dixit