शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (16:34 IST)

अभिनेत्री वीणा कपूर जिवंत असून, तिच्या मुलाने तिची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची बातमी समोर आली

veena kapoor
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अभिनेत्री वीणा कपूर आता राहिली नाही. मालमत्तेसाठी त्यांच्या मुलाने त्यांची हत्या करून मृतदेह नदीत फेकून दिला. काही कलाकारांनी याला दुजोरा देत हात जोडून श्रद्धांजलीही वाहिली. मीडियातही बातम्या आल्या.
 
आता चित्रपटांसारखा ट्विस्ट आला आहे की वीणा कपूर जिवंत आहे. त्यांनी पोलीस ठाणे गाठून असा प्रकार पसरवणाऱ्या अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली. दुसरीकडे, लोकांनी त्यांच्या मुलाला इतके वाईट संदेश पाठवले की तो आजारी पडला.
 
हा गोंधळ कसा झाला? खरं तर, एका महिलेची हत्या झाली होती जिला तिच्याच मुलाने मारलं होतं. त्या महिलेचे नावही वीणा कपूर होते. ही अभिनेत्री वीणा कपूर असल्याचे लोकांना समजले आणि नंतर गैरसमज निर्माण झाला.
 
वीणा कपूरच्या मुलाने सांगितले की, तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि असे वाईट कृत्य करण्याचा विचार कधीच करू शकत नाही. 'मिड डे'शी बोलताना वीणा कपूरने सांगितले की, या गैरसमजामुळे तिला काम मिळणे बंद झाले आहे आणि ती नाराज आहे.
Edited by : Smita Joshi