रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (21:13 IST)

रणवीर सिंहने वाचवला चिमुकल्याचा 'जीव', लोक म्हणाले- तू सुपरस्टार आहेस

रणवीर सिंग जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो एक चांगला माणूस आहे. आता रणवीरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.रणवीरने गर्दीत रडणाऱ्या मुलाला वाचवले, त्याच्यावर प्रेम केले. मग काय होतं... रणवीरचा व्हिडिओ समोर येताच लोक त्याचे चाहते झाले.  
 
रणवीर सिंग नुकताच मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. रणवीरमुळे कार्यक्रमाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.  लोकांच्या गर्दीत एक मूल मधेच अडकले आणि तो रडायला लागला. परत येताना रणवीरने मुलाला रडताना पाहिले  तो पुढे आला आणि त्याने मुलाला कडेवर घेऊन शांत केले. आणि गर्दीतून बाहेर काढले. 
 
एका निरागस मुलासाठी रणवीरचा हा गोड हावभाव लोकांना आवडला असून अभिनेत्याचे कौतुक होत आहे. रणवीरने मुलाला प्रेमाने आपल्या कडेवर घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून   चाहते रणवीरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत .
 
रणवीर सिंगबद्दल सांगायचे तर, सध्या तो त्याचा आगामी चित्रपट सर्कसचे जोरदार प्रमोशन करत आहे. रणवीरचा हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटाद्वारे लोक ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करतील. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला.  
 
सर्कसमध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे. 
 
Edied By - Priya Dixit