शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (21:03 IST)

'प्लॅनेट मराठी' आता पीआर आणि इव्हेंट्समध्ये

प्लॅनेट मराठी प्रॉडक्शन, प्लॅनेट मराठी ओटीटी, प्लॅनेट टॅलेंट यांच्यासह अनेक उपक्रमांच्या माध्यमातून 'प्लॅनेट मराठी' आपल्या भेटीला आहे. या सगळ्याच विभागांमधून 'प्लॅनेट मराठी'ने आपले वैविध्य जपत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही प्रबोधनात्मक संदेशही दिले. अल्पावधीतच 'प्लॅनेट मराठी'ने प्रेक्षकांना आपलेसे केले. आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर 'प्लॅनेट मराठी' आता एका नवीन वाटचालीसाठी सज्ज झाले आहे. लवकरचं "प्लॅनेट मराठी पीआर आणि इव्हेंट्स” च्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. मनोरंजन क्षेत्रासह आता कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रातही योगदान देण्याचा प्लॅनेट मराठीचा मानस आहे. 
 
"प्लॅनेट मराठी पीआर आणि इव्हेंट्स" अंतर्गत नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी पीआर आणि इव्हेंट्स मध्ये कॉर्पोरेट - सामाजिक - राजकीय इव्हेंट्स, कास्टिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ब्रँड्स कॅालॅब्रेशन, ब्रँड एंडोर्समेंट अश्या विविध सुविधा तुम्हाला अनुभवता येणार आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पकतेने आणि उच्च दर्जाच्या करून त्यांचा अनोखा अनुभव देण्यासाठी "प्लॅनेट मराठी पीआर आणि इव्हेंट्स" आपली नवी वाटचाल सुरू करणार आहे. 
 
'प्लॅनेट मराठी'च्या या नवीन वाटचालीबद्दल पीआर आणि इव्हेंट्सच्या प्रमुख गायत्री चित्रे म्हणाल्या, ''प्लॅनेट मराठीच्या जन्मापासून मी प्लॅनेट मराठीसोबत आहे. प्लॅनेट मराठीचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे, अनुभवला आहे. आज प्लॅनेट मराठीने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यापैकीच एक नवीन पीआर आणि इव्हेंट्स. मनोरंजन क्षेत्रात 'प्लॅनेट मराठी'चे नाव आहेच आता कॉर्पोरेटसह इतर क्षेत्रातही उंच भरारी घेण्यास 'प्लॅनेट मराठी' सज्ज झाले आहे. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांचे मनापासून आभार. त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आजवर आमच्या इतर उपक्रमांना ज्याप्रमाणे सर्वांनी आपलेसे केले तसेच या आमच्या नवीन वाटचालीतही तुमची साथ लाभेल, अशी आशा आहे.''