1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

Video : गणेशोत्सवानिमित्ताने 'प्रारंभी विनंती करू गणपती' गाणे सादर

Prarambhi vinati karu ganapati
'प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा..' ह्या श्लोकाचे पठण प्रत्येकांनी आपल्या शालेय जीवनात केले असेल. कोणत्याही कामाची सुरुवात करताना विघ्नहर्त्याला नमन करावा, असा अर्थबोध असलेला हा श्लोक एका
नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येत आहे. संगीतकार गणेश सातार्डेकर यांनी सादर केलेल्या या गाण्यात गणेशाचे आणखी काही श्लोकदेखील आपणास ऐकायला मिळणार असून, लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शित होत असलेले हे गाणं, गणेशभक्तांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नॉस्टेलजिया स्टुडीओची निर्मिती असलेल्या ह्या गाण्याचे जागेश्वर डोबळे  यांनी दिग्दर्शन तसेच संकलन केले असून, या गाण्याचे क्रिएटीव्ह हेड अभिजित जोशी हे आहेत. आशुतोष आपटे यांच्या कॅमे-यात चित्रित झालेल्या या गाण्यात एकूण २० पुरुष आणि स्त्री कलाकरांचा समावेश दिसून येतो. कोरस असलेल्या या गाण्याचे स्वर, गणेशभक्तीत तल्लीन असणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसांना मंत्रमुग्ध करून टाकणारे आहेत. बाप्पाच्या आगमनास आणि त्याच्या खिदमतीस सादर होत असलेले हे गाणे, यावर्षीच्या गणेशोत्सवात भक्तांना एकाचवेळी बाप्पाच्या अनेक श्लोकांचे पठण करून देणारे ठरणार आहे.