रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (16:02 IST)

प्रथमेश परब ची नवीन वर्षात OTTवर ग्रँड एंट्री

prathames parab
भुवन बम स्टारर ‘ताजा खबर द्वारे आपला मराठमोळा प्रथमेश परब नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहे. या वेब सिरीजमध्ये तो पिटर ची भूमिका साकारणार आहे. ताजा खबर या वेब सिरिजचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले आहे. 
यात एका नव्या आणि अनोख्या दुनियेची सफर रंजक स्वरूपात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 
या वेब सिरीज मध्ये भुवन बामसोबत श्रिया पिळगावकर, शिल्पा शुक्ला, मिथलेश चतुर्वेदी, जेडी चक्रवर्ती आणि देवेन भोजनी हे कलाकार देखील दिसणार आहेत. नुकतेच या वेब सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला आहे. ताजा खबर ही वेब सिरीज ६ जानेवारी रोजी डिस्ने हॉट स्टार वर प्रदर्शित होत आहे.
Published By -Smita Joshi