गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (12:07 IST)

अभिनेता प्रथमेश परब विवाह बंधनात अडकणार !

Actor Prathamesh Parab will get stuck in marriage! Marathi Cinema news In Marathi
Photo- Instagram
सध्या चित्रपटसृष्टीत लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. मराठी सिनेसृष्टीत देखील अनेक कलाकार मंडळी वैवाहिक बंधनात अडकले आहे. आता अभिनेता प्रथमेश परब देखील लवकरच वैवाहिक बंधनात अडकणार अशी चर्चा सुरु आहे. त्याचे कारण असे की प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवर एक फोटो शेअर केला असून त्यात नवरदेवासारखे कपडे घातले असून शेरवानी घालून, मुंडावळ बांधून हातात हार घेऊन उभा असून त्याने ''आमचं ठरलं आहे.लग्नाला यायचं हं ..असे कॅप्शन देऊन चाहत्यांना लग्नाचं थेट आमंत्रण दिल आहे. 
या फोटोमुळे त्याने सर्वांचे लक्षण वेधले आहे. आता प्रथमेश लग्नाच्या वेडित लवकरच अडकण्याची चर्चा सुरु आहे. 
 
Edited By- Priya Dixit