Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ जानेवारीपासून होणार 'लकडाऊन' पूर्ण महाराष्ट्रात चर्चा

luckdown marathi movie
Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (14:28 IST)
लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला तत्पर आहेत. एक एक करून सगळेच आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करत असून, इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची सुद्धा तारीख निश्चित झाली असून, या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकतंच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सचिन अहिर, रविंद्र मिर्लेकर यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा चित्रपट येत्या २८ जानेवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गमतीची गोष्ट आहे. लकडाऊन या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची
मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या ...

21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला
कोलकाता. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील दम दम परिसरात एका 21 वर्षीय मॉडेलने तिच्या ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रूमर्ड बॉयफ्रेंड ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रूमर्ड बॉयफ्रेंड Siddhant Chaturvediसोबत दिसली, अफेअरच्या चर्चेला उधाण
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धांत ...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment
करण जोहरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ...

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांनंतरच डॉक्टरांना रुग्णालयातून घरी पाठवायचे होते, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र काही ...