रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (17:10 IST)

‘रांजण’मध्ये भाऊ कदम आणि भारत गणेश पुरे एकत्र

भाऊ कदम
सध्या ‘रांजण’ या आगामी मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे. विद्याधर जोशी यांच्यासोबतच भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या सिनेमात दिसणार आहेत. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे.