1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 28 जानेवारी 2024 (12:40 IST)

मराठी अभिनेत्रीवर बलात्कार, गुन्हा दाखल

rape
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर सोलापुरातील एका तरुणाने विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तरुणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

विराज रविकांत पाटील असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात एका 32 वर्षीय अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अभिनेत्री तरुणी ही मॉडेलिंग करत असून तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तिची ओळख समाज माध्यमातून आरोपी विराजशी झाली.

त्याने अभिनेत्रीला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट देऊन लग्नाचे आमिष दिले.नंतर त्याने अभिनेत्रीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तिने लग्नाचे विचारल्यावर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरु केले. त्याने अभिनेत्रीशी संपर्क कमी केला.नंतर तिने प्रत्यक्ष भेटल्यावर त्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही. पोलिसात गेली तर पिस्तुलाचा धाक दाखवून मी तुला बघून घेण्याची धमकी दिली.नंतर अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक तपास करत आहे.   
Edited By- Priya Dixit