सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2024 (16:55 IST)

Pune ब्रेकअपच्या रागातून तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल केला

Pune Crime प्रियकराने कॉल करत आहे सांगून प्रेमसंबंध असताना प्रेयसीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला. मग ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करुन व्हिडिओ व्हायरल केला. 
 
तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
बालाजीनगर धनकवडी येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ज्यावरुन अहमदनगर येथील जुनेद शकील मोमीन (वय 21) याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे मात्र आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी जुनेद मोमीन यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. दोघे सोबत असताना व्हिडिओ कॉलवर बोलत होते दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना आंघोळ करताना व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. तेव्हा आरोपीने फिर्यादीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन घेतला. नंतर ब्रेकअप झाल्यावर रागाच्या भरात तरुणाने इंन्स्टाग्रावर तरुणीच्या नावाने फेक अकाउंट तयार केले आणि त्यावर व्हिडिओ व्हायल केला.
 
विनयभंगाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.