शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (10:50 IST)

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Prabha atre Death
Prabha atre
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे आज शनिवारी पहाटे पुण्यात झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचे नातेवाईक परदेशात असल्यामुळे ते आल्यावर त्यांच्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका असून त्यांना पदमश्री, पदमभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्या एक प्रतिभावंत गायिका, लेखिका, विदुषी आणि प्राध्यापिका होत्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचा जगभरात प्रसार केला. ठुमरी, दादरा, ख्याल गायकी, गझल, उपशास्त्रीय, संगीत, नाट्य संगीत, भाव संगीत व भजन यांच्यावर त्यांचे चांगलेच प्रभूत्व होते. त्यांनी एकाच मनाचा वरून 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम नावी होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 
 
Edited by - Priya Dixit