शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

आर्ची झाली दहावी पास

सैराट चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रच काय देशात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकूला दहावीत 66.40 टक्के गुण पडले आहे. रिंकूचे चाहत्यांमध्ये तिच्या दहावीच्या निकालाबद्दलही प्रचंड उत्सुकता होती.
 
आर्चीला पाचशेपैकी 327 गुण मिळाले आहेतमराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50 असे मार्क्स रिंकूने मिळवले आहेत. फक्त एका महिन्याच्या कालावधीत अभ्यास करुन रिंकूने परीक्षेत यश मिळवले असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. रिंकूच्या निकालाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
विशेष म्हणजेच दहावीत शिकत असतानाच रिंकूचं कन्नड सैराटचं शुटिंग सुरु होतं. त्यामुळे तिची टक्केवारी कमी होईल असं अनेकांना वाटत होतं. पण रिंकूने फर्स्ट क्लास मिळवला म्हणून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.