रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (20:52 IST)

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा मराठी चित्रपट तुफान कमाई करत आहे

चित्रपट चालत नाहीत, प्रेक्षक वळत नाहीत, या तक्रारी अनेकदा आपल्या मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये ऐकायला येतात. पण, सध्या बॉक्स ऑफिसचे चित्र थोडे वेगळे दिसत आहे. नवीन वर्षात मराठी चित्रपटांची दणक्यात सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड'  हा मराठी चित्रपट तुफान कमाई करत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर आज दहाव्या दिवशीही चित्रपटाला हाउसफुल गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत अंदाजे ३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बॉलिवूडचा 'सर्कस' आणि हॉलिवूडचा 'अवतार २' या चित्रपटांचे शो कमी करून 'वेड'चे शो वाढवण्यात आले आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor