Bigg Boss Marathi 4 :'बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा आज
कलर्स मराठी वरील बिगबॉस मराठी चं चौथे पर्व देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घरात पोहोचले असून आज या पर्वाचा अंतिम सोहळा 7 वाजता कलर्स मराठीवर येणार असून या सिजनचा महाविजेता कोण ठरणार हे कळेल.
या पर्वाचा प्रवास 100 दिवसांपूर्वी 16 सदस्यांबरोबर सुरु झाला. आता या घरात टॉप 5 सदस्य अपूर्व नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आणि राखी सावंत हे स्पर्धक आहे. आज या पाचही स्पर्धकांमधून या सिजनचा महाविजेता कोण असणार हे कळेल. या पाचही स्पर्धकांनी आपापल्या परीने बिगबॉसच्या घरात फुल ऑन इंटरटेनमेंट ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कधी अपूर्वाचा मोठा आवाज,तर कधी राखीच्या राड्याने घरात मनोरंजन झाले.कधी कधी घरच्यांच्या आठवणीने डोळे पाणावले तर कधी सदस्य घराबाहेर गेला ही गोष्ट मनाला चटका लावून गेली. हे घर अशा अनेक क्षणांचे साक्षिदार राहिले आहे. शोच्या फिनालेचा प्रोमो समोर आला आहे. यात स्पर्धक आपल्या नृत्यांने सोहळ्यात रंगत आणतांना दिसताय.
आता या टॉप 5 स्पर्धकांमधून बिगबॉस मराठी 4 या सिजनचा महाविजेता किंवा महाविजेती कोण असेल हे संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार.
Edited By - Priya Dixit