शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (12:18 IST)

तू तेव्हा तशी फेम अभिनेत्याचा साखरपुडा

swanand ketkar
Instagram
'तू तेव्हा तशी' फेम अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा; त्याचे फोटो सोशल मीडियावर VIRAL होत आहे. मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच ‘फुलाला सुगंध मातीचा’फेम अभिनेत्री भूमिजा पाटीलचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
 
झी वाहिनीवरील ‘तु तेव्हा तशी’मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता स्वानंद केतकरचा साखरपुडा झाला आहे. स्वानंदने अक्षता अपटे हिच्याशी 4 जानेवारीला साखरपुडा केला. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत स्वानंदने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Edited by : Smita Joshi