गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (15:14 IST)

Bigg Boss मराठीच्या पाचवा सिझनला सुरवात, रितेश देशमुख होस्ट करणार

ritesh deshmukh
बिगबॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे. यंदा रितेश देशमुख या कार्यक्रमाला होस्ट करणार आहे. बिगबॉसच्या घराला काचेच्या महालासारखं सजवले आहे. 

बिगबॉसच्या घरात 16 स्पर्धकांचा प्रवेश झाला असून घरात कोकण हार्टेड गर्ल, योगिता चव्हाण, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, निखिल दामले, अभिजित सावंत, इरिना रुडाकोवा, घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, निकी तांबोळी, धनंजय पोवार, अरबाज पटेल, सुरज चव्हाण, आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे स्पर्धक दिसणार आहे.   

बिगबॉस मराठी सिझन पाच दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार.बिगबॉस मराठीच्या पूर्वी चारही पर्वाच होस्टिंग महेश मांजरेकरने केले होते यंदा ही जबाबदारी रितेश देशमुख यांना देण्यात आली आहे. 

बिगबॉस मराठी सिझन 5 च्या घराला एंट्रीला प्रवेश द्वार आहे. नंतर लिव्हिंग रूम एरिया आहे. या मध्ये स्पर्धकांसाठी आरामदायी फर्निचर दिले आहे. कॅप्टनच्या रूम आणि बेडरूमला निळ्या जांभळा रंगाची थीम दिली आहे.  
 
Edited By- Priya Dixit