गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (12:16 IST)

लहान मुलांमध्ये रमते रुपाली

नाती म्हंटली कि त्यात जबाबदाऱ्या आल्या, आणि जिथे जबाबदाऱ्या येतात तिथे आशा- अपेक्षा देखील ओघाने येतातच ! आजकाल मैत्रीमध्येही अनेक हेवेदावे, मान अपमान आड येत असतात. दीर्घकाळ टिकतील अश्या वाटत असणाऱ्या कित्येक नाती याच काही कारणांमुळे तुटतात. त्यामुळे जर मैत्री करायची असल्यास लहान मुलांशी करा, असा सल्ला अभिनेत्री रुपाली भोसले देते. 'बालपण देगा देवा' असे आपण नेहमी बोलतो. कारण लहानपणाची मज्जाच काही न्यारी असते. ती मज्जा परत परत अनुभवायची असल्यास लहान मुलांमध्ये रमणे केव्हाही चांगले, असे मत रुपालीचे आहे.
 
रुपालीचे मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत अनेक मित्र पहायला मिळतील, पण मैत्रीचा कन्फर्ट झोन तिला तिच्या लहान मित्रांमध्येच मिळतो.
तिचे आतापर्यंतचे सोशल नेटवकींग साईटवरचे व्हिडियोज आणि पोस्ट पाहिले असता, आपल्याला दिसून येईल कि तिला लहान मुलं खूप आवडतात ! नात्यामधली कटुता या निरागस मुलांना शिवत नसल्याकारणामुळेच आनंद काय असतो, हे त्यांच्याकडून प्रत्येकजण शिकत असतो. रुपालीसुद्धा याच विचारांची असल्याकारणामुळे, तिच्या मित्रपरिवारात लहानग्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.