रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (10:16 IST)

Rupali Bhosle: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसले आजारी, रुग्णालयात दाखल

rupali bhosale
स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते ही  सर्वांची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले हिच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली. अभिनेत्रीने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती स्वतः इंस्टाग्रामवर शेअर करत दिली. तिने इंस्टावर रुग्णालयात दाखल झाली असून बेडवरचा फोटो टाकला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. तिने इंस्टावर  फोटो टाकत लिहिले आहे. स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. झाड जितके निरोगी असेल तितके फळ चांगले देते.आयुष्यात अनेक गोष्टी अचानक घडतात पण, आपण केवळ त्यांना हसून सामोरे जाऊ शकतो. कारण, आयुष्य खूप सुंदर आहे. माझी काल एक जोतिषी शस्त्रक्रिया झाली असून  मी आता बरी आहे. आपण सर्वानी दिलेल्या प्रेम आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. बऱ्याचवेळा आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. जे घडतंय घडू देतो. असं करू का. दुर्लक्ष करू नका. शरीराकडे दुर्लक्ष करू का. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या शरीराला गृहीत धरू नका. वेदना त्रासदायक होई पर्यंत आपण शरीराकडे लक्ष देत नाही असं करू नका. वेळीच योग्य उपचार घ्या.  तिने आपल्या पोस्टमधून डॉक्टरांचे आभार मानले आहे. 
अभिनेत्री रुपाली भोसले हिने आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारली असून ही निगेटिव्ह पात्राची भूमिका असून प्रेक्षकांचा मनात बसली आहे. संजना या मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार आहे. 

Edited By- Priya Dixit