मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (16:16 IST)

अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात

vikram gokhale
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहे. ते 82 वर्षांचे आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता त्यांची तब्येत खालावल्याचे कळतंय.

अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
Edited by : Smita Joshi