सचिन खेडेकर यांनी 'ताऱ्यांचे बेट'च्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ!

sachin khedekar
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (14:08 IST)
नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'ताऱ्यांचे बेट' या मराठी चित्रपटाचा आज दहावा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रसिद्ध चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेता सचिन खेडेकर यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर करत, या अप्रतिम कथानकासाठी आणि त्यांना त्याचा भाग बनवण्यासाठी नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
व्हिडिओमध्ये, खेडेकर यांनी सांगितले की असा चित्रपट काळाची गरज आहे. ते म्हणतात, "मला 'ताऱ्यांचे बेट'चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे." चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सामान्य कारकुनाभोवती फिरते. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो.
चित्रपटामध्ये दाखवलेल्या मूल्यांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, "पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल."

सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत यांचे आभार मानले आणि नीरज पांडे यांच्या विषयीही गौरवोद्गार काढले, ते म्हणाले की, " क्रिएटिव्ह निर्माता, नीरज पांडे यांनी खूप मदत केली. त्यांनी या कथेला पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार."

या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे, अश्विनी गिरी, अश्मिता जोगळेकर, किशोर कदम, शशांक शिंदे आणि ईशान तांबे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याची एकता कपूर, शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी सहनिर्मिती केली होती.
या गौरवशाली दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कलाकार, क्रू, नीरज पांडे, शीतल भाटिया आणि फ्रायडे फिल्मवर्क्स यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा आहे की ते भविष्यातही आम्हाला अशी दुर्मिळ रत्ने देत राहतील.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं

कंगना रनौत ला दिलासा नाही , कंगनाला कोर्टानं फटकारलं
अभिनेत्री कंगना रनौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला बऱ्याच ...

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मुन्नार हिल स्टेशन
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि ...

बरोबरच जाऊ या

बरोबरच जाऊ या
पक्याचे वडील पक्याला रागावत असतात वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही, तुला ...

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं ...

Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं होतं?
मधू पाल 2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी ...

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका

'मुलगी झाली हो' महाराष्ट्राची नंबर 1 मालिका
मराठी मालिक आणि त्यांच्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रेम आणि प्रतिसाद लाभत असतो. ...