सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (14:54 IST)

सईला मिळाला जोडीदार

Photo : Instagram
बिग बॉसच पहिल सीझनमधून सगळ्यांच्या घराघरांत पोहचली ती सई लोकुर. हीच सई लोकुर लग्न बंधनात अडकणार आहे. कारण तिने तिचा जोडीदार निवडला आहे. सई लोकुर ही मूळची बेळगावची.

तिने काही मराठी सिनेमात काम केले. पण तिची चर्चा झाली ती बिग बॉसमध्ये. मराठी बिग बॉसच्या  सीझनमध्ये तिची जोडी जमली होती ती पुष्कर जोगसोबत. आता तिने एक पोस्ट टाकून आपल्याला जोडीदार मिळाल्याचे सांगितले आहे. सईने या फोटोत आपल्या जोडीदाराचा चेहरा दाखवलेला नाही. मात्र, दोघेही पाठोरे उभे असल्याचा हा फोटो आहे. सई लोकुरने आता लग्न ठरवले असून अनेकांचा अंदाज तिने चुकवला आहे. तिचा हा जोडीदार तिने निवडला आहे. म्हणजे हा प्रेमविवाह नसून तो अरेंज असणार असल्याचे कळते.