सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:32 IST)

वाचा, रेमडेसीवीरविषयी आरोग्यमंत्री काय बोलले

रेमडेसीवीर हे इंजेक्शन काही संजीवनी नाही. या इंजेक्शनमुळे रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही, अशी धक्कादायक कबुली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपे यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 
 
राजेश टोपे हे पू्र्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं. नागपूरात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. पण रेमडेसीवीर ही काही संजीवनी नाही, त्याने रुग्णांचा जीव वाचतोच असं नाही. ज्याला गरज आहे त्यालाच ते इंजेक्शन द्यायला हवं, रेमडेसीवीर इंजेक्शन कुणाला द्यायचं, याबाबत कोव्हिड टास्कफोर्समार्फत राज्यातील सर्व डॉक्टरांना गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
 
यावेळी त्यांनी नागपूर कोरोनाचं हॉटस्पॉट बनल्याची कबुली देत नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मेडिकलमध्ये कोव्हिडचे 500 बेड्स वाढवण्याच्या आणि एम्समध्ये 500 ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.