राज्यात १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान
राज्यात मंगळवारी १० हजार ९७८ रुग्ण बरे झाले तर १५ हजार ७६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ११ हजार ७५२ नमुन्यांपैकी ८ लाख ०८ हजार ३०६ नमुने पॉझिटिव्ह (१९.१९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ७९ हजार ५१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ०२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी ३२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८ टक्के एवढा आहे.