सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:23 IST)

राज्यात १४ हजार ७१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात गुरुवारी ९१३६ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ७१८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७८  हजार २३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३८ लाख ६२ हजार १८४ नमुन्यांपैकी ७ लाख ३३ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९९ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख २४ हजार २३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.