सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (08:36 IST)

राज्यात १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्ण

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून रविवारी ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 
 
पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रविवारी  २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.