शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (09:04 IST)

राज्यात कोरोनामुळे ३२६ रुग्णांचा मृत्यू

326 patients
राज्यात गुरुवारी १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील तपासण्यात आलेल्या ३४ लाख १४ हजार ८०९ नमुन्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३२ टक्के एवढा आहे.  
 
११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईन
तपासण्यात आलेल्या ३४,१४,८०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,४३,२८९ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७६,२६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.