शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (08:51 IST)

'या' शहरात 3 सप्टेंबरपासून लोकल बसेस रस्त्यावर धावणार

कोरोना लॉकडाउनमुळे पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमल बससेवा सुरु करण्यात येणार आहे. येत्या 3 सप्टेंबर 2020 पासून 25 टक्के बस रस्त्यावर धावणार आहे. असा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएल बस सुरु होणार असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल परिवहन सेवा देशामध्ये संचारबंदी लागू झाल्यापासून बंद करण्यात आलेली होती. पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका कार्यक्षेत्रामधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, कामगार तसेच नागरीकांकडून दैनंदिन पीएमपीएमएल बससेवा सुरु करण्याची ब-याच दिवसांपासून वारंवार मागणी करण्यात येत होती.