धोनीने IPLमध्ये आपली चमक नाही दाखवली तर ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील

MS Dhoni
Last Modified शनिवार, 25 जुलै 2020 (16:33 IST)
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Captain Cool M S Dhoni)हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर पडले. आता टी-२० विश्वचषक झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसेल हे नक्की. पण त्याआधी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डीन जोन्स याने धोनीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.
“टीम इंडियाचे संघ निवडकर्ते सध्यातरी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या दोघांबद्दलच विचार करत असतील. जर धोनीची IPL 2020 मधील कामगिरी दमदार असली तरच धोनीसाठी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण जर धोनी IPLमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही तर मात्र धोनीला ‘टीम इंडिया’चे दरवाजे कायमचे बंद होतील. धोनीने स्वत: तो दरवाजा उघडा ठेवला आहे. त्याला मिळालेली विश्रांती त्याच्यासाठी लाभदायक ठरू शकते. पण मला विचाराल तर दीर्घ विश्रांतीनंतर संघात स्थान मिळवणं खूप कठीण असतं”, असे डीन जोन्स म्हणाला.
दरम्यान, IPLच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल BCCI अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं असून १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. IPL गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून BCCIने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवली होती असे पटेल यांनी सांगितलं.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना ...

IND vs Aus: असा विचार केला नव्हता की मी ऑस्ट्रेलियामध्ये ...

IND vs Aus: असा विचार केला नव्हता की मी ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू करेन टी नटराजन
आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करून नेट गोलंदाज भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला ...

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश
50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी ...