शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (09:37 IST)

कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद

गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस आहे. यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आज रात्री कशेडी घाटापासून जवळच पोलादपूरमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. आहे. या घटनास्थळी पोलादपूर पोलीस, एलअँडटीची टीम दाखल झाली आहे. अशा रात्रीच्या वेळी दरड हटवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
 
पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. रात्रभर दरड उपसण्याचे काम सुरू राहणार असून कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे